सुवर्णप्राशन आणि सुवर्णप्राशनाचे फायदे

suvarnaprashna treatment in hadapsar

” डॉक्टर , माझं बाळ सारखंच आजारी पडतंय. जरा वातावरण बदलले की याला सर्दी होते, कधी तापही येतो. असं का होतं? असं होऊ नये म्हणून काय करावं लागेल?”

प्रॅक्टिस करताना जाणवते की कमी अधिक फरकाने जवळ जवळ सर्वच आई वडिलांना हा प्रश्न पडलेला असतो.

बदललेल्या वातावरणाचा परिणाम आपल्या सगळ्यांच्या शरीरावर होत असतो. पण काही जण आजारी पडत नाहीत आणि काही जण पडतात.

असे का होते?

याचं उत्तर म्हणजे शरीराची प्रतिकारशक्ती (Immunity).

वातावरणातील बदलांचा शरीरावर परिणाम होऊ नये म्हणून शरीराची जडणघडण उत्तम होणे गरजेचे असते.

आणि हा जडणघडणीचा काळ म्हणजे बालपण. लहानपणी शरीराची प्रतिकारक्षमता मजबूत बनू शकते.

यासाठी आयुर्वेदामध्ये एक अत्यंत प्रभावी संस्कार सांगितला आहे तो म्हणजे  सुवर्णप्राशन.

मुलांचा सर्वांगीण म्हणजेच शारीरिक आणि मानसिक तसेच बौद्धिक विकास होण्यासाठी या सुवर्णप्राशनाचा चांगला उपयोग होतो.

सुवर्णप्राशन म्हणजे काय?

सुवर्ण म्हणजे सोने. सोन्याचे भस्म, आणि काही विशिष्ट आयुर्वेदिक औषधे यांचे मध व तुपामध्ये मिश्रण केले जाते व दर महिन्याच्या पवित्र पुष्य नक्षत्रावर ते चाटण लहान मुलांना चाटविले जाते. यालाच सुवर्णप्राशन असे म्हणतात.

सुवर्णप्राशन कोणासाठी उपयुक्त?

नवजात बालकापासून ते 16  वर्षांपर्यंतच्या सर्वाना सुवर्णप्राशन करता येते.

काही वर्ष हे औषध नियमित घेतल्यास चांगला फायदा झालेला दिसून येतो.

सुवर्णप्राशनाचे फायदे:

  • मुलांचा सर्वांगीण (बौद्धिक व शारीरिक) विकास होण्यास मदत मिळते
  • रोग प्रतिकारशक्ती वाढते. संसर्गजन्य रोग तसेच ऋतुबदलांमुळे होणाऱ्या आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढते
  • धी – बुद्धी, धृती – धारणाशक्ती, स्मृती – स्मरणशक्ती, मेधा – आकलनशक्ती यांचा विकास उत्तम प्रकारे होतो
  • शारीरिक बल वाढते आणि पचनशक्ती सुधारण्यास मदत होते
  • सुवर्णप्राशन मुलांना अधिक निरोगी बनविण्यास मदत करते

सुवर्णप्राशनं हि एतत् मेधाग्निबलवर्धनम् ।

आयुष्यं मंगलं पुण्यम वृष्यं वर्ण्यमं ग्रहापहम् ।।

– काश्यपसंहिता

अशाप्रकारे, जाणून घ्या सुवर्णप्राशन आणि लहान मुलांमध्ये Immunity कशी वाढवावी याबद्दल अजून माहिती हवी असेल तर हा Video नक्की पहा

 

अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क साधा :

डॉ. स्वाती नलगे

डॉ. दत्तात्रय नलगे

आत्रेय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, गर्भसंस्कार केंद्र,

विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहाजवळ,

ह्रिषिकेश सोसायटी, माळवाडी रोड, हडपसर, पुणे

फोन – 9860007992